आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! वसमतचे ‘बहुचर्चित’ तहसीलदार सागर ननावरे यांची अवघ्या ४५ दिवसांतच उचलबांगडी! ‘संथ’ कारभारामुळे चर्चेत राहिलेल्या प्रशिक्षणार्थी तहसीलदारांचा महसूल कर्मचाऱ्यांकडून ‘निरोप समारंभ’ संपन्न

संपादक हरनामसिंग चव्हाण

धक्कादायक! वसमतचे ‘बहुचर्चित’ तहसीलदार सागर ननावरे यांची अवघ्या ४५ दिवसांतच उचलबांगडी!
‘संथ’ कारभारामुळे चर्चेत राहिलेल्या प्रशिक्षणार्थी तहसीलदारांचा महसूल कर्मचाऱ्यांकडून ‘निरोप समारंभ’ संपन्न

वसमत
काही महिन्यांपूर्वीच प्रशासकीय कारभाराची सूत्रे हाती घेतलेले आणि आपल्या ‘संथ’ कार्यपद्धतीमुळे नेहमीच तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेले प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर ननावरे यांचा प्रशासकीय कार्यकाळ अखेर संपुष्टात आला आहे. अवघ्या ४५ दिवसांच्या अत्यंत संक्षिप्त आणि वादळी कालावधीनंतर ननावरे यांना वसमतमधून निरोप देण्यात आला असून, महसूल वर्तुळात या मोठ्या प्रशासकीय घडामोडीची जोरदार चर्चा रंगली आहे.
६ महिन्यांवरून थेट ४५ दिवसांवर घसरण!
सागर ननावरे यांनी जेव्हा वसमतच्या तहसीलदारपदाचा प्रोफेशनल चार्ज घेतला, तेव्हा त्यांचा हा प्रशिक्षणार्थी कार्यकाळ किमान ६ महिने राहील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आपल्या संपूर्ण कार्यकाळात कमालीचा ‘वेळकाढूपणा’ आणि संथ निर्णयप्रक्रियेमुळे ते कमालीचे बहुचर्चित ठरले. परिणामी, अवघ्या दीड महिन्यातच (४५ दिवस) त्यांच्या या कार्यकाळाला अचानक पूर्णविराम मिळाला. ६ महिन्यांवरून थेट ४५ दिवसांवर आलेल्या या कार्यकाळामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.
नाराजी विसरून परंपरेनुसार निरोप
तहसील कार्यालयातील संथ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक आणि खुद्द महसूल कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत कमालीची नाराजी होती. मात्र, ‘प्रशासकीय परंपरेला’ जागत अखेर काल तहसील कार्यालय वसमत येथे त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी (SDO) विकास माने यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी (सर्कल ऑफिसर), तलाठी आणि महसूल विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या वतीने सागर ननावरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रशासकीय वर्तुळात उपस्थित झाले प्रश्नचिन्ह अवघ्या ४५ दिवसांतच तहसीलदारांची झालेली ही तडकाफडकी उचलबांगडी वसमतच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून गेली आहे. आता वसमत तालुक्याचा कारभार हाकण्यासाठी येणारे नवीन तहसीलदार कोण असणार आणि ते या तालुक्याचा गाडा कसा रुळावर आणतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी व कर्मचारी:
या निरोप समारंभाप्रसंगी उपविभागीय अधिकारी विकास माने, मावळते तहसीलदार सागर ननावरे, विनोद डोणगावकर, धैर्यशील गवळी, औंधेकर, राहुल रेनगुंटवार, संध्या काळे, मीना शिंदे, मीनल चव्हाण, गिरीजा आशेगावकर, मधीलवार, प्रियंका खडसे, सुप्रिया जिंतूरकर, सरिता इंगोले, क्षीरसागर, धाडवे, प्रचीती भेंडे, गरुड, इंगळे, राजू पांचाळ यांच्यासह महसूल विभागातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!