आपला जिल्हा

हिंगोली जिल्हा परिषदेचा गौरव! ‘महासाधना सप्ताहात’ उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनाकडून सन्मान

संपादक: हरनामसिंग चव्हाण

हिंगोली जिल्हा परिषदेचा गौरव! ‘महासाधना सप्ताहात’ उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनाकडून सन्मान

हिंगोली:संपादक हरनामसिंग चव्हाण

राज्य शासनाच्या ‘महासाधना सप्ताहा’अंतर्गत राबवण्यात आलेल्या आयगॉट (iGOT) प्रणालीवरील नोंदणी आणि प्रशिक्षण उपक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात येणार असून, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
मंत्रालयात रंगणार सोहळा
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे मुंबईतील मंत्रालयात आज, ०८ मे २०२६ रोजी दुपारी ३.०० ते ४.३० या वेळेत ‘टेक वारी २.०’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या ‘त्रिमूर्ती प्रांगणात’ हा सोहळा पार पडणार आहे.
प्रशिक्षणात हिंगोली अव्वल
दिनांक ०२ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत ‘महासाधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेने सक्रिय सहभाग नोंदवत प्रशासकीय प्रशिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम कार्य केले. या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेचा विशेष सन्मान केला जात आहे.
या पुरस्कारामुळे हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून जिल्हा प्रशासनाचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!