आपला जिल्हा

दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन; रिपब्लिकन युवा सेनेचा इशारा

संपादक हरनामसिंग चव्हाण

दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन; रिपब्लिकन युवा सेनेचा इशारा
वसमत (संपादक) हरनामसिंग चव्हाण

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाटोणा येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची समाजकंटकांनी विटंबना केल्याच्या घटनेचा आणि पुणे जिल्ह्यातील भोर येथे एका चार वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.
रिपब्लिकन युवा सेनेचे युवा जिल्हा सरचिटणीस आकाश दातार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, वाटोणा येथे बुद्ध मूर्तीची तोडफोड ही जाणीवपूर्वक करण्यात आलेली असून, यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरतपूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे.
प्रशासनाला इशारा
या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित गुंडांवर व नराधमांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जर शासनाने यावर ठोस पावले उचलली नाहीत, तर केवळ हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर निवेदक आकाश यादवराव दातार यांच्यासह खालील मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत:
राहुल करवंदे (युवा जिल्हाध्यक्ष)
प्रल्हादराव जोंधळे
राजेंद्र वेडे
गजानन कांबळे
कैलास जोंधळे
सुरज वाघमारे
नामदेव नंदनवरे
शंकर ठोके
गौतम हाटकर
सुभाष इंगोले
देवा कांबळे
विजय कांबळे
विजय दातार
केशव कदम
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी हिंगोली आणि पोलीस अधीक्षक हिंगोली यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!