आपला जिल्हासामाजिक

कन्हैया बाहेती यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

कन्हैया बाहेती यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

वसमत नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

वसमत (संपादक ):हरनामसिंग चव्हाण

वसमत नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी आणि शहराचे लोकप्रिय व्यक्तिमत्व कन्हैया बाहेती यांचा वाढदिवस आज शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला असून, सर्वसामान्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनीच या सोहळ्यात सहभाग घेतला.
आमदार राजूभैय्या नवघरे यांच्याकडून शुभेच्छा
वाढदिवसानिमित्त वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन कन्हैया बाहेती यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील विकासकामांबाबत आणि बाहेती यांच्या जनसंपर्काबाबत मान्यवरांनी कौतुक केले.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याप्रसंगी माऊली बेडे,गटनेते सचिन दगडू, उपनगराध्यक्ष इमरान अली यांच्यासह सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. तसेच नगरपालिकेतील महिला कर्मचारी, अधिकारी यांनीही बाहेती यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय गुत्तेदार वसीम कुरेशी, मारिअन्ना वाघमारे आणि शहरातील इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस:
कन्हैया बाहेती यांच्या वाढदिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे वसमत शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मोबाईल स्टेटसवर त्यांच्या शुभेच्छांचा फोटो पाहायला मिळत होता. ‘लोकप्रिय नेतृत्व’ अशा शब्दांत नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वसामान्य जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळेच शहरात आज उत्सवी वातावरण पाहायला मिळाले.
छायाचित्र: नागेश चव्हाण, वसमत

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!