आरोग्य व शिक्षण
पुणे येथील चिमुकलीवर अत्याचार करणा-या नराधमास मरेपर्यंत फाशी द्या -ब्राह्मण महासंघ वसमतची मागणी
मुख्य संपादक रामु चव्हाण

वसमत (संपादक ):हरनामसिंग चव्हाण
पुणे जिल्ह्यातील नऱ्हे येथे चिमुकल्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ वसमत येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेतील आरोपीला कठोरता कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी ब्राह्मण महासंघाच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देण्यात आले..

पुणे येथील या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील गुन्हेगारावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अशा क्रूर घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे महासंघाने म्हटले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
नऱ्हे (पुणे) येथील घटनेतील आरोपीचा निषेध करून त्याला त्वरित मरेपर्यंत फाशी देण्यात यावी.
पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.
महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी शासनाने अधिक कडक कायदे अमलात आणावेत.
यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, शाखा वसमतचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. निवेदनावर आनंद बाबुराव औसेकर, अनिल सुधाकरराव देशपांडे, सुनील दत्तोपंत कसबेकर, संतोष नरहरि पाथरीकर, अविनाश श्रीनिवास गिरगावकर,सौ कुमुदिनी बडवणे ,सिमा बडवणे,जयश्री बडवणे,चंदा दिक्षित,आनंद बडवणे ,विनोद लाठकर ,शाम माळवटकर,सुयश कात्नेश्वकर ,सुधाकर सरदेशपांडे,दुर्गादास पांडे,शाम बडवणे ,व्यंकटेश दैठणकर,अमित देशपांडे ,सुहास कुलकर्णी ,नंदकिशोर पारवेकर ,महेश जोशी ,अभयकुभार कोरटकर,अनिता पांडे ,प्राजक्ता सरदेशपांडे,आरती मडके ,वर्षा मोहरील सह मकार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या मागणीचे निवेदन स्वीकारल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
छाया नंदु परदेशी




