आपला जिल्हा

मुंबईला फेऱ्या मारण्यापेक्षा गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या सोडवा पक्ष वाढवा ” हिंगोली जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी आमदार राजू नवघरेंचा कार्यकर्त्यांना थेट इशारा!

संपादक हरनामसिंग चव्हाण

*”मुंबईला फेऱ्या मारण्यापेक्षा गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या सोडवा पक्ष वाढवा ” हिंगोली जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी आमदार राजू नवघरेंचा कार्यकर्त्यांना थेट इशारा!*

*वसमत (CT NEWS):*

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हिंगोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आणण्याचा ठाम निर्धार आमदार राजू नवघरे यांनी व्यक्त केला आहे. हिंगोली येथील हॉटेल शिवलीला पॅलेसच्या सभागृहात रविवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य जिल्हास्तरीय कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका, पक्ष संघटना मजबुतीकरण आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारानिमित्त या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
दिग्गज पदाधिकाऱ्यांची मांदियाळी
या भव्य मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, प्रदेश चिटणीस प्रकाश थोरात, माजी उपनगराध्यक्ष शेख निहाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हा सरचिटणीस भिमराव कवडे, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीचे उपसभापती अशोकराव शिरामे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव पोले, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. वसंतराव मस्के, आणि राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष शेख अफजल उपस्थित होते.
याशिवाय कैलास खिल्लारे, राहुल खंदारे, तन्हाजी बेडे, जिजाऊ हरणे, कन्हैया बाहेती, सचिन दगडू, संजय दराडे, शेख नाजिम, वसमतचे उपनगराध्यक्ष शेख इमरान, माजी नगराध्यक्ष राजू देशमुख, संचित गुंडेवार, विकास शिंदे, सतीश टापरे, बाळूमामा ढोरे, हिंमत राठोड, वैशाली वाघ, विजय डोखळे, शेख अफजल आणि नितीन चाटसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, सेलप्रमुख, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती.
“मुंबईला जाण्यापेक्षा बूथ स्तरावर ताकद वाढवा”
आमदार राजू नवघरे
मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार राजू नवघरे यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. कार्यकर्त्यांचे कान टोचताना ते म्हणाले,
“पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक कार्यकर्त्याने विनाकारण मुंबईला निवेदने घेऊन जाण्यापेक्षा थेट गावपातळीवर उतरून काम करण्याची गरज आहे. बूथ स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी कठोर मेहनत घ्या.”
पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही देत त्यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक गाव, बूथ आणि प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याचे आवाहन केले. पहिल्यांदाच जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला एवढ्या मोठ्या मेळाव्याचे स्वरूप आले असून, हा उत्साह पाहता राष्ट्रवादीला हिंगोली जिल्ह्यात ‘नंबर वन’ पक्ष बनवणे आता अवघड नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षशिस्त आणि जनसंपर्क पाहूनच उमेदवारी: अनिल पतंगे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे यांनी आगामी काळातील पक्षाच्या धोरणांची माहिती दिली. ते म्हणाले की,आगामी काळात पक्ष संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले जाईल. केवळ पक्षशिस्त, जनसंपर्क आणि संघटनात्मक काम पाहूनच आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जाईल; इच्छुक उमेदवारांच्या कामाचा सखोल आढावा घेऊनच पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील. तसेच, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी संपर्क अभियान राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे नुकत्याच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा झालेला जाहीर सत्कार. मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन या नगरसेवकांचा गौरव करण्यात आला, ज्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या दौऱ्याचे नियोजन
या बैठकीत केवळ निवडणुकांवरच नव्हे, तर आगामी काळातील पक्षाच्या विविध उपक्रमांवरही सखोल चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या आगामी हिंगोली जिल्हा दौऱ्याचे नियोजन.
पक्षाच्या आगामी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे, युवक व महिला संघटन अधिक बळकट करणे आणि बूथनिहाय बांधणी करणे.
आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती आखणे.
सूत्रसंचालन व आभार
या यशस्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औंढा नागनाथचे तालुकाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दराडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सेनगाव पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र गडदे यांनी मानले. या मेळाव्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांसाठी एक नवे चैतन्य निर्माण झाले असून, पक्ष आता अधिक आक्रमकपणे मैदानात उतरण्यास सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!