आपला जिल्हा

ऐतिहासिक गुरुद्वारा दमदमा साहिब परिसरातील तळे खोलीकरण कामाची आमदार राजूभैया नवघरे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी!

संपादक हरनामसिंग चव्हाण

  • ऐतिहासिक गुरुद्वारा दमदमा साहिब परिसरातील तळे खोलीकरण कामाची आमदार राजूभैया नवघरे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी!
    पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे कत्राटदाराला कडक निर्देश; ‘ॲक्शन मोड’मुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण

वसमत (CT NEWS):
संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत येथील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुद्वारा दमदमा साहिब परिसरातील तळ्याच्या खोलीकरणाच्या कामाला कमालीचा वेग आला आहे. पावसाळा अगदी तोंडावर असल्याने या कामाचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि कामाचा दर्जा तपासण्यासाठी वसमत चे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन कामाची सविस्तर पाहणी केली.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाले पाहिजे, यादृष्टीने आमदारांनी संबंधित कंत्राटदाराची (गुत्तेदार) चांगलीच कानउघाडणी केली. कामावर तातडीने जेसीबी (JCB) आणि मजूर (लेबर) वाढवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
“पावसाचा पहिला सुळका पडण्यापूर्वी हे काम फायनल करा, कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दमही त्यांनी यावेळी कंत्राटदाराला दिला.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार नवघरे यांच्यासोबत शहरातील अनेक प्रमुख आजी-माजी पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
कन्हैया बाहेती (नगराध्यक्ष प्रतिनिधी)
नगरसेवक युनूस पापुलर, राजेश भोसले, दळजीतसिंगजी गुरुद्वारा जथेदार , मनोज चव्हाण, सुरेश धोत्रे, मरिअना वाघमारे, चंदू फेगडे, योगेश गठणी, गजू नवघरे
यांच्यासह गुरुद्वारा परिसरातील नागरिक आणि इतर प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसराचे सुशोभीकरण करणार: आमदार राजूभैया नवघरे
यावेळी आमदार राजूभैया नवघरे यांनी गुरुद्वारा परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढत,
“लवकरच गुरुद्वारा परिसराचे भव्य सुशोभीकरण करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी उपस्थित भाविकांना व नागरिकांना दिले.

—“ऐतिहासिक गुरुद्वारा दमदमा साहिब परिसरातील तळ्याचे खोलीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे परिसरातील जलपातळी वाढण्यास मोठी मदत होईल. परंतु, पावसाळा अगदी तोंडावर असल्याने हे काम वेळेत पूर्ण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज प्रत्यक्ष पाहणी करून कंत्राटदाराला मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवून काम युद्धपातळीवर संपवण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
—-आमदार राजूभैया नवघरे

आमदार साहेबांचा गुरुद्वाराकडून सत्कार
आमदारांनी दाखवलेली ही तत्परता आणि *कामाचा धडाका पाहून गुरुद्वारा व्यवस्थापनाच्या वतीने आमदार राजूभैया नवघरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

आमदार राजूभैया नवघरे यांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे गुरुद्वारा परिसरातील नागरिकांनी आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले असून, हे काम आता पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!