आपला जिल्हाक्राईम स्टोरी

वसमतजवळ धामणगाव शिवारात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह; ओळख पटवण्याचे कुरुंदा पोलिसांचे आवाहन

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतजवळ धामणगाव शिवारात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह; ओळख पटवण्याचे कुरुंदा पोलिसांचे आवाहन

वसमत CT NEWS

वसमत (हिंगोली):
वसमत ते औंढा (ना.) जाणाऱ्या रोडलगत असलेल्या मौजे धामणगाव शिवारातील एका शेतात एक अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव शिवारात असलेल्या बालाजी खुळखुळे यांच्या शेत गट क्र. १९३ मध्ये हा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. कुरुंदा पोलिसांनी पो.स्टे. कुरुंदा गु.र.नं. २३१/२०२६ कलम १०३(१), २३८ भा.न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:
वय: अंदाजे २५ ते ३५ वर्षे
चेहरा: गोलाकार (खोपडी फुटलेली)
वर्ण: सावळा
केस: काळे आणि लांब
नख: वाढलेले
उंची: १६५ ते १६७ सेमी
ओळखण्याची खूण:
१) गळ्यात सिल्वर धातूची चैन (साखळी) आहे.
२) घटनास्थळाच्या शेजारी काळ्या रंगाचे रबरी हातातील कडे आढळून आले आहे.
माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
वर नमूद केलेल्या वर्णनाचा किंवा फोटोंमधील व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन तपासिक अधिकारी आणि कुरुंदा पोलिसांनी केले आहे. योग्य माहिती देऊन ओळख पटवून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, असेही पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक:
सपोनि महादेव पुरी (तपासिक अधिकारी, पो.स्टे. कुरुंदा): 8668543100
पोलीस स्टेशन कुरुंदा: 8669900691
पोउपनि जिव्हारे (स्था.गु.शा. हिंगोली): 8888859970
पोनि मोहन भोसले (स्था.गु.शा. हिंगोली): 7038833358

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!