आपला जिल्हासामाजिक

वसमत येथे तलावाच्या खोदकामात पुरातन शिवलिंग सापडले; भाविकांची गर्दी, पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची मागणी

मुख्य संपादक रामु चव्हाण

वसमत येथे तलावाच्या खोदकामात पुरातन शिवलिंग सापडले; भाविकांची गर्दी, पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची मागणी

वसमत ” : रामु चव्हाण

– वसमत शहरातील गुरुद्वारा परिसराजवळ असलेल्या ऐतिहासिक तलावाच्या खोलीकरण व सौंदर्यीकरण कामादरम्यान एक पुरातन शिवलिंग आढळून आले आहे. बुधवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असताना सुमारे 8 फूट खोलीवर काळ्या पाषाणातील हे शिवलिंग दिसले. याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शिवलिंग अंदाजे 3 फूट उंच असून त्यावर प्राचीन काळातील कोरीव काम दिसते. स्थानिक जाणकारांच्या मते, हे शिवलिंग किमान 400 ते 500 वर्षे जुने असावे. शिवलिंग सापडल्याची बातमी कळताच वसमतसह परिसरातील गावांमधून शेकडो भाविकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी फुले, बेलपत्र वाहून पूजा केली तर काहींनी हर-हर महादेवचा जयघोष केला.

विशेष म्हणजे, याच तलाव परिसरात दोन महिन्या पुर्वी खोदकाम करताना एक भुयारी मार्ग देखील सापडला होता. त्यावेळी पुरातत्व विभागाने पाहणी केली होती, मात्र पुढे कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. आता पुन्हा शिवलिंग सापडल्याने या परिसराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नागरिक व इतिहास अभ्यासकांनी पुरातत्व विभागाने तातडीने याठिकाणी पाहणी करावी, अशी मागणी केली आहे. “हे शिवलिंग कोणत्या काळातील आहे, येथे प्राचीन मंदिर होते का, याचा शोध घेणे गरजेचे आहे. शासनाने या वास्तूचे जतन करावे,” अशी भावना स्थानिक रहिवासी विनायक महाराज यांनी व्यक्त केली.

व्हिडिओ पहा

https://www.instagram.com/reel/DaDBbsZqgrl/?igsh=MWl1ZWF5MGtkczJzOQ==

दरम्यान, तहसीलदार व नगरपरिषद अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा व शिवलिंग सुरक्षित ठिकाणी हलवून त्याभोवती तात्पुरते कुंपण घालण्यात आले आहे. पुरातत्व विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात यावे अशी मागणी वेदमूर्ती अमोघ महाराज यांनी केली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!