हट्टा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे आणि त्यांच्या पथकाने गुटखा विक्रीवर धाड टाकत 13496 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत 25 मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हट्टाशिवारातील हट्टा ते सावंगी रोडवर एका आखाड्याजवळ आरोपीत अंबादास लिंबाजी खाडे राहणार हट्टा याच्याजवळ शासनाने प्रतिबंधित असलेला गुटखा त्यामध्ये विविध कंपनीचा गुटखा त्याचे अंदाजित रक्कम रुपये 13496 रुपयाचा मुद्देमाल जोकी शासनाने बंदी घातलेला मिळून आला सदरील इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या गुटखा जप्त करण्यात आला असून या संबंधित आरोपीचा विरुद्ध हट्टा पोलीस स्टेशन येेथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे , पोलीस कर््मचारी बोराडे ,ताम्रध्वज कासले, सूर्यवंशी, सिद्दिकी यांच्या पथकाने केली आहे.