जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. मंगळवारी 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारताला कधीही विसरता येणार नाही असे दुःख दिले आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी, अनेक जण जखमी झाले आहेत.
या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यां मध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, युएई, नेपाळ आणि उत्तर प्रदेश-हरियाणा येथील लोकही मारले गेले आहेत. मृतांमध्ये सर्व पुरूषांचा समावेश आहे.
या घटनेचा निषेध म्हणून दि.26 एप्रिल रोजी हिंगोली जिल्हा बंदची हाक सकल हिंदु समाजाचा वतीने देण्यात आली आहे
या घटनेचा निषेध करण्यासाठी वसमत शनिवारी दिवसभर कडकडीत बंद रहाणार आहे असल्याची माहित सकल हिंदु समाजाने आज एका बैठक घेऊन जाहीर केले आहे.
यासाठी सर्व हिंदु समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सकाळी 11 वा.झेंडा चौक वसमत येथे उपस्थित रहावे व येथुन निषेध मोर्चा तहसील कार्यालय येथे जाऊन निवेदन देण्यात येणार असल्याची सकल हिंदु समाजाचा वतीने सांगण्यात आले आहे