अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र संघटकपदी गोपालराव सरनायक तर जिल्हा उपाध्यक्षपदी भीमराव बोखारे यांची निवड
वसमत / रामु चव्हाण
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या हिंगोली जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली तसेच यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गोपालराव सरनायक यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. वसमत येथील पत्रकार भीमराव बोखारे यांची यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
आज दिनांक एक जानेवारी 2023 रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष विकास दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश संघटक गोपालराव सरनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी प्रथम गतवर्षी जिल्हा कार्यकारिणीचा आढावा घेण्यात येऊन जिल्हाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली जिल्हाध्यक्ष हे पद नवीन सदस्यस देण्याचे ठरल्यामुळे सर्वानुमते महेंद्र पुरी यांच्या नावावर एक मत झाले अध्यक्ष व पाहुण्यांच्या वतीने महेंद्र पुरी यांच्या जिल्हाध्यक्ष पदास मान्यता देण्यात आली. यावेळी वसमत तालुका अध्यक्ष पदासाठी दैनिक पुढारीचे आडगाव रंजेबुवा येथील प्रतिनिधी प्रल्हाद चव्हाण यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वसमत तालुकाध्यक्षपदी तर उपाध्यक्ष मारुती बेंडे, तालुका सल्लागार देविदास चट्टे यांची सुद्धा या बैठकीत निवड करण्यात आली. यावेळेस जिल्हाध्यक्ष महेंद्र पुरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे जिल्हा सल्लागार विकास दळवी, उपाध्यक्ष गोविंद देशमुख, भीमराव बोखारे, विलास लासुरे ,कार्याध्यक्ष गजानन देशमुख, सहकार्याध्यक्ष गोवर्धन खंदारे, सचिव रामा सारंग ,सहसचिव सय्यद अहमद ,कोषाध्यक्ष लक्ष्मण मालकर, सह कोषाध्यक्ष गोपाल सातपुते, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिवशंकर निरगुडे ,सह सल्लागार संदीप घुगे,जिल्हा संघटक सुरेश कीर्तने, जिल्हा सहसंघटक विश्वनाथ देशमुख यांची जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आली तर हिंगोली तालुकाध्यक्ष रमेश आढळकर ,सेनगाव तालुकाध्यक्ष गजानन मगर, औंढा तालुका अध्यक्ष अहमद पठाण ,वसमत तालुकाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, कळमनुरी तालुका अध्यक्ष गंगाधर अडकिने यांची सर्वांना यांची निवड करण्यात आली तसेच जिल्हा महिला कार्यकारणी निवडण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्षपदी मनीषा थोरात, सचिव पल्लवी अटल ,कोषाध्यक्ष गंगासागर पंडित यांची निवड केली या सर्व नूतन कार्यकारिणीचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश संघटक गोपालराव सरनायक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील पत्रकार आदिनाथ दशरथे, गजानन पवार, शीला ढगे, गजानन मगर निळकंठ भादलकर भागवत वाघ आदीसह जिल्ह्यातीलअखिल भारतीय ग्रामीण पत्रकारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.