वसमत तालुक्यातील तुळजापूर वाडी येथे सुरू असलेल्या सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर नांदेड पोलिसांनी धाड टाकून मुद्देमाल आणि नगदी असा एकूण 20 लाख 34 हजाराचा 430 रुपये मुद्देमाल जप्त केल्याची घटना दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी हट्टा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास मौजे तुळजापूर वाडी शिवारात दिलीप नागोराव चव्हाण राहणार तुळजापूर वाडी यांच्या शेतातील टिन शेडमध्ये बांधलेल्या गोठ्यामध्ये विविध जिल्ह्यातून आलेले 25 जुगारी हे या टिन शेडमध्ये अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते याबाबतची माहिती विशेष पोलीस उपमहा निरीक्षक नांदेड यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदरील माहिती अधारे नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस स्टेशन तालुका नायगाव चे पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले यांनी सदर ठिकाणी धाड टाकण्यासाठी पथक तयार करुन सदरील ठिकाणी धाड टाकण्याच्या सुचना दिल्याचे माहिती असुन पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले यानी सदरील तुळजापूरवाडी येथील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर
अंदरबहार खेळणाऱ्या 25 जनांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील रोख रक्कम व एक स्कार्पिओ असा एकूण 20 लाख 34 हजार 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी हट्टा पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हट्टा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पठाण हे करत आहेत यामुळे वसमत तालुक्यात जुगार अड्डा बिनधास्तपणे सुरू असल्याचे चर्चा नागरिकांतून होत आहे यावर वेळीच लगाम लावावा अन्यथा अनेक संसार उध्वस्त होतील याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.