मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोबतच…मा.नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार
वसमत/ रामु चव्हाण
शिवसेना पक्षात लागेल ग्रहण हिंगोली जिल्ह्यात सुध्दा पहावयास मिळत असून खासदार व आमदार पक्षातून गेल्यावर पदाधिकारी सुध्दा संभ्रमात आहेत.
त्यात वसमत विधानसभेतील पदाधिकारी सध्या तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत..
यातच सोशल मीडियावर वसमत चे माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार हे एका व्हिडिओ मध्ये शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील व कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या सोबत चा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ते शिंदे गटात गेल्याची चर्चा वसमत विधानसभा मतदारसंघात झाली.
यावेळेस वसमत सि.टी.न्यूज यानी श्रीनिवास पोराजवार यांच्याशी संपर्क साधला असता मी सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच सोबत आहे .तसेच खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांच्याशी माझे चांगले नाते संबंध असून दोन वर्षांपूर्वीचे एका कामानिमित्त मी त्यांची भेट घेतली होती.पण कोणी तरी त्यांचा फोटो व्हिडिओ टाकून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत.
तरी मी शिवसेना पक्ष सोडून कुठेही जाणार नाही असे सांगितले.