कृषी उत्पन्न बाजार समिती साठी आमदार राजू भैया नवघरे यांचा शेतकरी विकास पॅनल तर माजी सभापती राजेश पाटील इंगोले यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव पॅनल यामध्ये अटीतटीची निवडणूक ही झाली हे जवळपास निश्चित झाले असून या निवडणुकीमध्ये सहकारी संस्था, व्यापारी मतदारसंघ, हमाल मापारी मतदारसंघ यासाठी 3035 मतदारांपैकी 2971 मतदारांनी आज मतदान केले असून यामध्ये कोण बाजी मारणार हे आता सोमवारी कळणार आहे.
तर 26 डिसेंबर रोजी सकाळी 9-00 वाजता सदरील निवडणुकीचा निकाल हा मतमोजणी द्वारे होणार असून यासाठी चार टेबलवर सात फेऱ्यांमध्ये हि मतमोजणी होणार आहे.
संस्था – मतदार – फेरी क्रमांक
सहकारी संस्था- 397 मतदार – 1
ग्रामपंचायत- 419 मतदार – 2
व्यापारी – 562 – मतदार – 3
हमाल मापारी – 496 मतदार – 4
हमाल मापारी – 515 मतदार – 5
सहकारी संस्था 325 मतदार – 6
कुरूंदा
ग्रामपंचायत- 321 मतदार – 7
कुरूंदा
वरील प्रमाणेेे चार टेबलांवर हि मतमोजणी होणार आहे.
एकूण चार टेबलवर सात फेऱ्यांमध्ये हि मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानदेव डुकरे, दुधमल यांनी दिली आहे. तर मतमोजणी ठिकाणी पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त राहणार आहे त्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम, पोलीस उपअधीक्षक किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, महिपाळे याांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.