ताज्या घडामोडी

लिट्ल किंग्ज शाळेचा जिल्हास्तरीय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत मुलींचा व मुलांचा संघ प्रथम

विभागीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड.

वसमत / रामु चव्हाण

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन , क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022 स्पर्धेत दि. 15 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2022 रोजी
महात्मा गांधी विद्यालय वसमत येथे संपन्न झाल्या , या जिल्हा स्त़रीय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत वसमत येथील लिटल किंग्ज शाळेचा 14 वर्षाखालील मुलींचा संघ जिल्ह्यातुन प्रथम आला .

तसेच सतरा वर्षाखालील मुलांचा संघ सुद्धा जिल्ह्यातून प्रथम आला आहे. आता या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
14 वर्षाखालील मुलींच्या संघात शाळेतील विद्यार्थ्यांनी
कु.साक्षी गंगाधर रोकडे , कु.श्रुती नंदुसिंग परदेशी , कु.मृणाली गंगाप्रसाद बाचनवार ,शेख सुमय्या रियाजुल अली, कु.प्राजक्ता प्रभाकर दळवी ,
कु.अक्षरा विलास पंडित , कु.श्रेया संतोष डाढाळे , कु.प्राची परसराम कोटे ,कु.नंदिनी संदिप करवंदे, कू.आरती वैजनाथ नाईक ह्या सहभागी झाल्या होत्या.
तर ,17 वर्षाखालील मुलांच्या संघात जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा मान याच शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला यात .सुमीत सतीश छपरे , शेख शहाजेब शेख हकीम , सुयश विनोद शिंदे
आदित्य़ रविकिर गावंडे ,प्रेम दिनेश गुजराथी , प्रणव लक्ष्म़ण बोड्डेवार ,सुमेध सुभाष वाघमारे ,प्रदुम्ऩ उमाकांत नवघरे ,सुमीत दत्ता डाखोरे ,जसवंतसिंग शैतानसिंग राजपुरोहित यांनी पटकाविला आहे.
या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक संजय ऊबारे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्या्थ्यांचे अभिनंदन शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी, मुख्याध्यापक गोविंद दळवी , जिल्हा क्रिडा अधिकारी जयकुमार टेभरे , संजय बेत्तीवार तसेच, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक संदीप सोनटक्के,वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले साहेब , शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्याचे आणि शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!