वसमत तालुक्यातील खुदनापूर शिवारामध्ये एका शेतात आखाड्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने धाड टाकून सात आरोपीतांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्या जवळून पाच मोबाईल, सहा मोटारसायकली व नगदी दहा हजार रुपये असा जवळपास अंदाजे चार लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे
या पथकामध्ये पोलीस नाईक गायकवाड ,पोलीस कर्मचारी, भांगे ,साहेबराव चव्हाण, विभुते ,नरवाडे ,लोखंडे, ढवळे,व-हाडे आधीच्या पथकाने ही कारवाई केली या आहे