आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

आ.राजूभैय्या नवघरे यांच्या प्रयत्नातून वाई गोरक्षनाथ मंदिरास तीर्थक्षेत्राच ब दर्जा

रामु चव्हाण

वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजुभैया नवघरे यांच्या प्रयत्नांना यश

श्री क्षेत्र गोरक्षनाथ मंतीरदिर वाई या तीर्थक्षेञास “ब” दर्जा प्राप्त..

वसमतनगर / रामु चव्हाण

वसमत विधानसभेचे आमदार राजु भैय्या नवघरे यांनी तालुक्यात कामाचा धडाका लावल असताना विविध विकास कामे खेचत भरीव निधी उपलब्ध करून कामे करत असून यात यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने मतदारसंघातील विविध विकासकामांना ज्या प्रमाणे गती मिळाली आहे, त्याच प्रमाणे वसमत विधानसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्राच्या विकास कामांनी ही गती धरली आहे.

आमदार राजुभैया नवघरे यांच्या प्रयत्नाने व ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून ग्रामीण तीर्थ क्षेत्र विकास योजनेअंतर्गत वाई गोरक्षनाथ महाराज या तीर्थक्षेत्राला आता ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राच्या व परिसराच्या सर्वांगीण विकासाला अधिक बळकटी येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!