
वसमत/ रामु चव्हाण
सध्या देशभर गाजत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाचा निषेध आणि लवजिहाद, धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी रविवारी वसमत येथे विराट हिंदूधर्म रक्षण मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिल्ली येथील श्रद्धा हत्याकांडा प्रमाणेच देशभरात हिंदु निष्पाप मुलींना प्रेमाच्या जाळ्यात उडत तिचे धर्मांतरण करत अशा अनेक हिंदू तरुणींना लव जिहादामध्ये अडकवून धर्मांतर करण्याबाबत तिच्यावर अत्याचार केला जात आहे. या घटनेवरून हिंदू समाजामध्ये या घटनेचा निषेध करत लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यसह संपूर्ण देशात कडकपणे लागु करण्यात यावा यासाठी हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चा वसमत येथे दिनांक 04 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे.
दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आठवडी बाजार वसमत येथून हा मूक मोर्चाला प्रारंभ होणार आहे.
तरी हिंदू महिला -भगिनी, बांधव, बाल,वृद्धांनी आपले सर्व कामे व्यवसाय शिक्षण विश्रांती बाजूला ठेवून सर्व हिंदू सहकार्याने हजारोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान सकल हिंदू समाज वसमतच्या वतीने करण्यात आले आहे या मोर्चामध्ये हिंदु धर्मातील साधु संत,महंत, ग्रामीण भागातून विविध विद्यार्थिनी,नागरिक,महिला सहभागी होणार असल्याने हा विराट हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चा रविवारी वसमत येथे निघणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले आहे.