ताज्या घडामोडी
वसमत येथे 20 हजार नागरिकांच्या उपस्थितीत विराट मुक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला
रामु चव्हाण

वसमत येथे न भूतो न भविष्यती हिंदू रक्षण विराट मूक मोर्चा
वसमत / रामु चव्हाण
वसमत शहरांमध्ये आज हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यात न भूतो न भविष्यती असा मूक मोर्चा यावेळी निघाला.

देशामध्ये सध्या गाजत असलेला श्रद्धा हत्याकांड याच्यासह देशांमध्ये रोज हिंदू धर्मांच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लवजिहादामध्ये अडकून तिच्याशी बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी अनेक हिंदू मुलींना या जबरन धर्मांतरामध्ये ओढल्या जात आहे.
या धर्मांतरांमध्ये अडकून हिंदू मुलींची शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असून यात हिंदू मुली रोज बळी पडत आहेत. यासाठी शासनाने नवीन कायदा करत लव जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा तात्काळ कडकपणे करावा या मागणीसाठी वसमत तालुक्यात आज हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

वसमत शहरातील शिवछत्रपती स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करून ध्वजारोहण झाल्यानंतर तालुक्यातील सर्व संत,महंत यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा शिवस्मारक,मोंढा -मामा चौक -बुधवार पेठ -सत्यनारायण टॉकीज- सत्याग्रह चौक- झेंडा चौक- गवळी मारुती मंदिर व उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये जवळपास 20 हजाराच्या वर सकल हिंदू समाजातील शिवभक्त, नागरिक, विद्यार्थिनी, महिला यांचा पुढाकार होता.
सदरील मूक मोर्चा साठी गेली दहा दिवस नियोजन सुरू असताना या मोर्चाच्या मुख्य मागण्या अशा होत्या की भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन व प्रसार करण्याचा कायदेशीर अधिकार दिलेला आहे .त्यासोबतच स्वच्छेने ने कोणताही धर्माच्या अनुसरण करण्याचे सवलती दिलेली आहे परंतु मागील काळामध्ये हिंदू धर्मातील अनेक व्यक्तींचे बेकायदेशीरपणे पैसे, नोकरी, लग्नाच्या आमिष तसेच इतर प्रलोभने दाखवून फसवणूक करून तसेच धमकावून इतर धर्मांमध्ये धर्मांतर करून घेतल्याचा आढळून येत आहे. तरुण हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाची आमिषाने त्यांचे धर्मांतर करून विवाह केल्याचे बरेच प्रकरणे समोर आले आहेत .अशा प्रकारे लवजिहादच्या माध्यमातून हजारो हिंदू मुली धर्मांतर करून इतर धर्मात पळवुन नेल्या जात आहेत .यापैकी काही मुलींचा वापर देश विघात कर्त्यासाठी तसेच आतंकवादी कारवायासाठी करण्यात येत असल्याने देखील केंद्रीय तपास यंत्रणा यांच्या निदर्शनास आलेले आहे. त्याप्रमाणे लवजिहादच्या माध्यमातून पळून गेलेल्या कित्येक मुलींचे निर्घृण हत्या सुद्धा केल्या गेल्या आहेत. यामुळे असे प्रकरणे घडु नयेत याची गांभीर्याने दखल घेतली नसल्यामुळे हे कृत्य करणाऱ्यांचे प्रवर्ति दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे .यामुळे अशा बेकायदेशीय धर्मांतरण करणे सुरू आहे ही बाब निश्चितपणे सकल हिंदू समाजाचे धार्मिक स्वातंत्र्य व तसेच देशाच्या सुरक्षेवर संकट असून याला वेळीच आळा घालावा अन्यथा भविष्यात देशावर मोठे संकट येऊ शकते.
- यामध्ये संपूर्ण देशांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा बनून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाईची तरतूद करून ही सर्व प्रकरणे हाताळण्याकरता स्पेशल कोर्टाचे नियुक्ती करण्यात यावी लवजिहाद प्रकरणांमध्ये एका स्वतंत्र विभागाची स्थापना करावी तसेच कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम धमकावणे अथवा फसवणूक इत्यादी प्रकारे सुरू असलेले धर्मांतरण रोखण्याकरिता कायदा करून असे बेकायदेशीर धर्मांतर करण्यास बंदी आणावे संपूर्ण देशांमध्ये गोवंश हत्या बंदी कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरिता स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यांच्या मार्फत सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी दिल्ली येथे हिंदू मुलगी श्रद्धा हिचा जहादीने केलेल्या निर्घृण हत्येचा खटला जलगती न्यायालयात चालवून सदर विकृतीला भर चौकात फाशी देण्यात यावी याबाबतचे निवेदन देशाच्या महामहीम राष्ट्रपती,पंतप्रधान,यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आज देण्यात आले आहे.
या निवेदनावर 108 श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य स्वामीजी ,श्री दिगांबर शिवाचार्य महाराज,श्री गुरु महंतया महाराज थोरावेकर ,श्री संत चैतन्य भारती महाराज ,श्री संत कल्याण गिरीजी महाराज ,हरिभक्त परायण नागनाथ महाराज चव्हाण, श्री नाग बाबा कुंजापूर्वी महाराज, श्री नागबाबा रोशन गिरीजी महाराज यांच्यासह विविध संत महंत विद्यार्थिनी नागरिक महिला यांच्या स्वाक्षरी आहेत.
यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चूक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच आज या मुक्काम मोर्चासाठी उपस्थित मोंढा किराणा इलेक्ट्रिक कपडा मार्केट यांचं सह विविध संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा देतआपले दुकाने बंद ठेवली होती.