आपला जिल्हाराजकीय
आमदार राजू भैय्या नवघरे यांना बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक कट- छ.शिवाजी महाराज पुतळा समिती
रामु चव्हा्ण

वसमत / रामू चव्हाण
वसमत येथे शिव उद्यानामध्ये बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आज सकाळी दाखल झाल्यानंतर ठिक ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत पुष्पवृष्टी करून झाले.
यावेळी वसमत विधानसभेचे सन्माननीय आमदार राजू भैय्या यांनी हार टाकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर गेले असता त्यांनी विटंबना केल्याचा व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली होती .
यावेळी पुतळा समितीचे पदाधिकारी यांनी स्पष्टीकरण देत सदरील पुतळ्याची आमदार राजू भैया नवघरे यांनी कुठलीही विटंबना केली नसून विनाकारण कोणीही यामध्ये राजकारण आणून आमदार नवघरे यांना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे सचिव सुनील भाऊ काळे यांनी सांगितले तर यावेळी शिवेश्वर बँकेचे चेअरमन शिवदास बोड्डेवार ां नीसुद्धा आमदार राजू भैया नवघरे यांनी त्यांच्या प्रतिष्ठान तर्फे या पुतळ्यासाठी भरीव योगदान दिले असून पाच लाखाचा निधी सुद्धा या पुतळ्यासाठी दिलेला आहे त्यामुळे विनाकारण लोक यामध्ये राजकारण आणून त्यांना व पुतळा समितीला बदनाम करण्याचे काम करत असल्याचे सांगितले यावेळी भाजपा शहराध्यक्ष शिवाजी अलडिंगे यांनी सांगितले की आमदार राजू भैया नवघरे यांनी आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी हार घालण्यासाठी आले व जागा अपुरी असल्याने व हार घालता येत नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याजवळ जाऊन त्यांनी हार घातला यामध्ये कुठलीही विटंबना महाराजांची झालेली नसून विनाकारण यात राजकारण आणून जो या विषयाची क्लिप व्हायरल करून भांडवल करत आहे तो शिवप्रेमी असू शकत नाही असे मत भाजपा शहराध्यक्ष शिवाजी अलडिंगे यानी बोलून दाखविले त्यामुळे विनाकारण आमदार राजू भैया नवघरे यांची बदनामी करण्याचा कट हाणून पाडण्याची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती च्या वतीने सांगण्यात आले आहे
तर मला राजकारणात बदनाम करण्याचा कट – आमदार राजु भैय्या नवघरे
– आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आल्यानंतर सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी त्या ठिकाणी हार घालण्यासाठी गेलो पण वीस फुटाचा पुतळा असल्यामुळे जाण्यास व हार घालण्यास जागा नसल्यामुळे मी घोड्याजवळ जाऊन हार घातला या वेळेस माझा बदनामी करण्यासाठी खोटी माहिती व्हिडिओ क्लिप द्वारे फिरवून माझी बदनामी करण्याचा कट केला जात आहे.यात मी महाराजांची कुठलिही विटंबना केलेली नाही .
पुतळा समितीचे सचिव सुनील भाऊ काळे यांची प्रतिक्रिया
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा बँकेचे चेअरमन शिवदास बोड्डेवार यांची प्रतिक्रिया
भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी अलडिगे यांची प्रतिक्रिया