वाई – मार्डी रोडवर अपघातात दोन जण ठार
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ ते मार्डी रस्त्यावर काल दिनांक 12 जानेवारी रोजी मोटरसायकलचा अपघात झाला यात सुभाष पिंपरे रा.राजवाडी हे जागीच ठार झाले तर सोबत असलेले गोविंद शंखपोळ हे गंभीर जखमी झाले होते या अपघाताची माहिती मिळताच कुरूंदा पोलिस स्टेशन चे सपोनि गजानन मोरे ,पोउनि गवळी,पोलीस कर्मचारी नेव्हल,गजानन भोपे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी गोविंद शंखपोळ यांना वसमत रूग्णालयात पाठवले पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले होते आज त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला.
Back to top button
Don`t copy text!