वसमत येथील गेले तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा माहूर जवळील उखळी घाटात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
या बाबात माहिती अशी की बबनराव किशनराव डाढाळे रा. मयूरनगर वसमत हे दि 13 जानेवारी शुक्रवार 2023 रोजी सकाळी 8 वाजता सोमठाणा ता वसमत येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.व नेहमी प्रमाणेच ते जिल्हा परिषद शाळेत जातो म्हणून MH 38 Z-5724, या नंबरची स्कुटी गाडी घेऊन घरून निघून गेलेत व ते परत घरी आले नाहीत.
सायंकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद होता.यावेळेस नातेवाईकांकडून शाळेत,मित्र इतर ठिकाणी विचारपुस केली पण त्यांचा कुठेच शोध लागला नाही या बाबत त्यांची पत्नी रसिका बबनराव डाढाळे यानी याबाबत वसमत शहर पोलीस स्थानकामध्ये मिसिंग तक्रार दाखल होती.
आज दि. 15 जानेवारी रोजी उखळी परिसरात काहि नागरिक मोहोळ झाडण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत शिक्षकाचा मृतदेह दिसला त्यावेळेस नागरिकांनी तात्काळ माहुर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला यावेळेस पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत.सदरील मृतदेहाची ओळख ही स्कूटी क्रमांकावर काढत वसमत येथील नातेवाईकांशी संपर्क केला.नातेवाईक सकाळीच घटनास्थळीच दाखल झाले असून मयत शिक्षक याना पत्नी,एक मुलगा,तीन मुली असल्याची माहीती आहे.
पण वसमत येथील शिक्षक बबनराव डाढाळे यांनी गळफास का घेतला हे मात्र कळू शकले नाही.