
वसमत/
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापनदिन वसमत येथील नावाजलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण वसमत येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री गोरे,भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर कार्यरत असणारे श्री गजानन गिरी, संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण, जगदीश चव्हाण, बालाजी चव्हाण व तसेच दोन्ही माध्यमाचे प्राचार्य व समन्वयक यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर मुलांनी गणतंत्र दिनाचे महत्त्व, भारतीय संविधानाबद्दल माहिती दिली तसेच आपले हक्क, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची माहिती सर्वांना दिली. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व समूह गीत सादर केले. सर्वच कार्यक्रमात मुले हिरीरीने सहभागी होते.
ध्वजारोहण परिसर आकर्षक सजावट करून सजविण्यात आला होता. गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन पाहता सर्वच भारावून गेले होते. या कार्यक्रमात मुलांचा उत्साह शेवटपर्यंत कायम होता.
डॉक्टर गोरे यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून सांगितले की- ‘देश मजबूत करायचा असेल तर आधी आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे खूप आवश्यक आहे’
तसेच नायब सुभेदार श्री गजानन गिरी यांनी २६/११ चा मुंबई येथे झालेल्या हल्ल्यात कशा प्रकारे आतंकवाद्यांना ढेर केले हे सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वल सोनी तर आभारप्रदर्शन श्री कालिदास कौसडीकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..