अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा (स्व.गोविंद सिनगारे रोखठोक पत्रकारिता पुरस्कार) दैनिक नवराष्ट्र, चे वर्धा जिल्हा उपसंपादक रामेश्वर काकडे यांना प्रदान करण्यात आला.
अर्धापूर पत्रकार संघाच्या वतीने दर्पणदिनानिमित्त अर्धापूर येथील नरहरी स्वंयवर मंगल कार्यालयात सोमवारी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्या आले होते. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पत्रकार रामेश्वर काकडे यांना स्व.गोविंदराव सिनगारे रोखठोक पत्रकारिता पुरस्कार देऊन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीक्रष्ण कोकाटे, उपजिल्हाधिकारी विकास माने, दैनिक गाववालाचे संपादक उत्तमराव दगडू, दैनिक समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख, तहसीलदार उज्वला पांगरकर, गटविकास अधिकारी मिना रावतळे, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अर्धापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नागोराव भांगे पाटील, उपाध्यक्ष गोविंदराव टेकाळे, कार्याध्यक्ष दिगंबर मोळके, पत्रकार लक्ष्मीकांत मुळे, रामराव भालेराव यांच्यासह पदाधिका-यांची उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याबद्दल रामेश्वर काकडे यांचे मित्रमंडळी व नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.