लाल बहादूर शास्त्री विद्यालय वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.प्रतिभा गोंगे,प्राचार्य श्री आसाराम दुधाटे,प्रि.प्रायमरी विभागाच्या प्रमुख दुर्गाताई ढेपे व उपमुख्याध्यापक श्री गोविंद गडगीळे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि पोवाडा गाऊन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी ——या विद्यार्थ्यांने शिवरायांची वेशभूषा केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करुन त्यांचे गड, किल्ले माहिती देऊन महाराजांचा ज्वाजल्य इतिहास उभा केला.
शाळेचे अध्यक्ष श्री.संदिप चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवप्रसाद कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री मोतीराम कोरडे यांनी मानले तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.