श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक डॉक्टर प्रवीण भाई तोगडिया यांची आज वसमत येथे विशाल हिंदू राष्ट्र जागृती सभा होणार असून यासाठी आज वसमत येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावे या संकल्पनेतून देव देश आणि धर्मासाठी लढणारे डॉक्टर प्रवीण भाई तोगडिया यांच्या ज्वलंत हिंदुत्वाला घेऊन समृद्ध हिंदू, गरिबी मुक्त हिंदू ,रोजगार युक्त युवा ,कर्जमुक्त किसान ,महंगाई मुक्त परिवार, लव जिहाद व गौहत्या या मुद्द्यावर कडवट विचार मांडणारे डॉक्टर प्रवीण भाई तोगडिया यांची आज वसमत येथील सार्वजनिक वाचनालय बहिर्जी शाळेच्या जवळ वसमत येथे त्यांची विराट सभा आयोजित करण्यात आली असून तत्पूर्वी त्यांचे आगमन वसमत येथे ठीक साडेचार वाजता होणार असून वसमत शहरातून रॅलीचे आयोजन ही करण्यात आले आहे. आणि पाच वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणामध्ये विराट सभा होणार असल्याची माहिती आयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे यासाठी वसमतध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल आहे.