आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक
विष्णू गणेश मंडळाच्या वतीने रविवारी भव्य रक्तदान शिबिर
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील नावाजलेले गणेश मंडळ म्हणजे श्री विष्णू गणेश मंडळ या गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते.
या वर्षी सुद्धा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता करण्याचे योजले असून या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिर होणारा असून सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सदरील रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते .यावर्षीचा हे रक्तदान शिबिराचं पंधरावे वर्ष असून सतत अखंडितपणे रक्तदान शिबिर घेणार जिल्ह्यातील एकमेव गणेश मंडळ असल्याच दिसून येते.
यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून सहकार्य करण्याचे आवाहन विष्णू गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. तर यावेळी नागरिकांचे ईश्रम कार्ड हे मोफत काढून देण्यात येणार आहे
दिनांक
24/09/2023
वार – रविवार
वेळ – सकाळी 10 ते 6 वा. पर्यंत
स्थळ
श्री विष्णू गणेश मंडळ
घोटेकर यांचा वाडा, शहर पेठ
सत्यनारायण टॉकीज जवळ,वसमत




