वसमत / रामु चव्हाण
मराठा आरक्षणा साठी मनोज जरांगे पाटील हे गेले पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच जागोजागी साखळी उपोषण आंदोलने सुरू आहेत ा आंदोलनाची झळ राजकीय पुढाऱ्यांना चांगलीच बसत असल्याने गावात पुढार्यांना गावबंदी केल्याने पुढा-यांना फिरणे बंद झाले .मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळावे यासाठी सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे त्यामुळे मराठ्यांना तात्काळ आरक्षण लागू करावे यासाठी आज हिंगोली लोकसभेचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावाने राजीनामा लिहित खासदारकीचा राजीनामा दिला आहे .
या पाठोपाठ शिंदे गटाचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रभाकर उर्फ राजू चापके यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्याकडे आपल्या शिवसेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख राजू चापके म्हणाले की जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास माझा पूर्ण पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे .त्यामुळे सरसकट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता राहणार नाही आणि पक्षाचा कुठलेही काम करणार नाही त्यामुळे मी माझा शिवसेना तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू चापके यांनी सांगितले.
Back to top button
Don`t copy text!