आपला जिल्हाक्राईम स्टोरीदेश विदेशमहाराष्ट्र
वसमत येथे मराठा समाज आक्रमक पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला फासले काळे
रामु.चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
मराठा समाजास सरसकट कुणबी समाजामधून 50% च्या आत टिकेल असे आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलन करते मनोज दादा जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे गेली तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ाजकीय पुढार्यांना गावबंदी, साखळी उपोषण ,आमरण उपोषण यांच्यासह कॅन्डल मार्च असे आंदोलने केली जात आहेत .तरीही मठ्ठा सरकारला अजूनही मराठा आरक्षण द्यावेसे वाटत नाही या अनुषंगाने वसमत तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे वसमत शहरातील तहसील कार्यालय येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गेली दोन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणामध्ये आज दुसरा दिवस असून उपोषण स्थळी वकील संघ वसमत तालुका व महिला भगिनी या मोठ्या संख्येने यासाठी उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत .





