दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी मा जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांनी तहसीलदार वसमत यांच्यामार्फत वसमत मधील मोडी लिपीतील कुणबीच्या नोंदी शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मोडीतज्ञ प्रा डॉ कामाजी डक साहेब यांची नियुक्ती केली होती
त्या अनुषंगाने भूमी अभिलेख कार्यालयातील नमुना नंबर 33 व 34अगदी बारकाईने व काळजीपूर्वक तपासणी केली असता औंढा तालुक्यातील सात गवापैकी 4 गावात कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत पैकी असोला तर्फे लाख 69,भोसी4, गांगलवाडी 3, ढेगज1 अशा एकूण 77 कुणबी नोंदी औंढा तालुक्यात आढळून आल्या आहेत.
तसेच वसमत भूमी अभिलेख कार्यालयातील 21 गावातील नमुना नंबर 33 व 34 ची काळजीपूर्वक तपासणी केली असता ब्राह्मणगाव खुर्द 1 सारोळा 1, आंबा चोंडी 1, आणि कौडगाव 17 अशा वसमत मधे एकूण 20 कुणबी च्या नोंदी सापडल्या आहेत.
यासाठी भूमीअभिलेख कार्यालय वसमत येथील प्रमुख श्री सांगवीकर साहेब सांगवीकर , श्री गोरे व इतर कर्मचारी आणि औंढा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील श्री मालवणकर सर व श्री पाईकराव यांनी विशेष मेहनत घेतली.
हिंगोली जिल्ह्यातील एकूण 28 पैकी 8 गावात एकूण 97 नोंदी आढळल्यात याचा अर्थ असा होऊ शकतो की अजूनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडू शकतात. कारण हिंगोली जील्ह्यात एकूण 600 च्या वर गावे आहेत .
जिल्यातील प्रत्येक भूमी अभिलेख कार्यालयाने नमुना नंबर 33 व 34 , तहसील कार्यालयातील नमुना नंबर 13 व 14 तसेच रजिष्ट्री ऑफिस मधील 1935 पूर्वीच्या रजिष्ट्र्या व इतर महत्त्वाचे कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे,असे तज्ञ व जानकारांचे मत आहे.
यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी सांगितले की अतिशय बारकाईने कागदपत्रांची तपासणी सुरू असून सर्व कागदपत्रे हे मोडी लिपी मध्ये असल्यामुळ अनेक नोंदी आढळण्याची शक्यता आहे. कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे ज्यांच्याकडे मोडी लिपीचे कागदपत्रे असतील त्यांनी तहसील कार्यालयात सदरील कागदपत्रे तपासणीसाठी घेऊन यावी असे आवाहनही डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी केले.