आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक
पुरातन राम मंदिरात विजयादशमी निमित्त पेटणार सहस्त्रद्वीप
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
वसमत शहरातील अति प्राचीन पुरातन श्रीराम मंदिर, माळीवाडा बोधानंद मठ ,शहर पेठ वसमत येथे विजयादशमीनिमित्त श्रीराम मंदिरात सहस्त्रदिप प्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सर्व हिंदू बांधवांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या घरून एक तरी दिवा (मातीची पणती) आणून श्री राम मंदिरामध्ये लावावी आणि या मंदिरामध्ये सहस्त्र दिप प्रज्वलनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
एक दिवा आपल्या कुटुंबासाठी
एक दिवस हिंदू जनजागृतीसाठी
एक दिवस शेतकऱ्यावर देशावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी
एक दिव समाजातील अनिष्ट रूढी परंपरा हुंडा परंपरा जाळून टाकण्यासाठी
एक दिवा सीमेवर संरक्षण करणाऱ्या जवानांची शक्ती बळकट करण्यासाठी मनोधैर्य वाढवण्यासाठी
एक दिवा कोरोना काळातील कोविड योद्धांसाठी
एक दिवा अखंड हिंदुस्तानाच्या प्रगतीसाठी
लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.