मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठायोध्दा मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदान येथे गेली चार दिवसा पासुन अमरण उपोषणास बसले आहेत.
तसेच त्याना पाठिंबा म्हणून वसमत येथे माजी नगरसेवक रविकिरण वाघमारे हे तहसील कार्यालया समोर गेली चार दिवसा पासुन अमरण उपोषणास बसले आहेत.
सरसकट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे,मराठा व कुणबी ही एकच जात असुन ,हैदराबाद व सातारा गॅझेट लागू करावा या मागणीसाठी मनोजदादा जरांगे हे अमरण उपोषणास बसले आहेत त्याचा मागणीचा लवकरात लवकर दखल घेऊन मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे अन्यथा महिला सुद्धा मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी महाराष्ट्रातून कुच करणार आहेत.
यासाठी दि.03 सप्टेंबर 2025 रोजी बुधवारी सकाळी 11 वा वसमत तालुक्यातून जवळपास 400 ट्रॅक्टर चा वर महिलांचा नेतृत्वात मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे.