वसमत / रामु चव्हाण
वसमत परभणी रोडवरील रेल्वे पुल व कॅलन जवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत यामुळे अनेक नागरीक,विद्यार्थी ,महिला ,जेष्ठ नागरिक जखमी झालेले आहेत व रोजच अपघातात जखमी होत आहे.याबाबत प्रसारमाध्यमावर बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यावर गुत्तेदाराने थातुर मातुर खड्डे बुजून वेळ मारून नेली आता भर पावसात परिस्थितीत जैसे थे आहे.या खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या सणासुदीच्या काळात नागरिकांची शहराकडे ये-जा वाढली आहे. त्यामुळे या पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे खड्ड्याला डब्याचे स्वरूप आले आहे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या शाळेतील अनेक विद्यार्थी जखमी होत आहेत तसेच या ठिकाणी वसमत तालुक्याचे जीवन वाहिनी असलेल्या महिला रुग्णालयात अनेक महिला प्रसूतीसाठी उपचारासाठी येत असतात त्यांना या खड्ड्यातूनच प्रवास करत रुग्णालयामध्ये उपचारासाठी जावे लागत आहे यासाठी हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे अन्यथा येत्या दोन-तीन दिवसांत रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवावे आणि नागरिकांना होणारा त्रास वाहने चालवताना होणारी कसरत दुर करावी. या मार्गे शालेय विद्यार्थी कामगार शेतकरी वाहन चालक महिला नोकरवर्ग यांना दररोज मोठी कसरत करावी लागते. याकडे आपण विशेष लक्ष देऊन मागणी पुर्ण करावी अन्यथा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास प्रशासनाकडे रक्कम नाही असे गृहीत धरून दिनांक ३१ आॅगष्ट रविवार पासुन ठराविक वेळी भिक मागो आंदोलन करून ती रक्कम गुत्तेदाराला रस्ता दुरूस्तीसाठी दान म्हणून देण्यात येईल असे निवेदन उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार वसमत याना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे रा.थोरावा यानी दिले आहे.