आपला जिल्हामहाराष्ट्र

आ राजू भैया नवघरे यांचा प्रयत्नाने; राखोंडे परिवाराला २ लाखांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द

मुख्य संपादक रामु चव्हाण

वसमत:हरनामसिंग चव्हाण

“संपूर्ण वसमत मतदारसंघ हे माझे कुटुंब असून, आपल्या कुटुंबातील सदस्यावर संकट येते तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे,” अशा शब्दांत आमदार राजू भैया नवघरे यांनी आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
आरळ येथील स्व. भाऊसाहेब बाजीराव राखोंडे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या कठीण काळात संबंधित कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी आमदार नवघरे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने २ लाख रुपयांचा मदत निधी (धनादेश) राखोंडे परिवाराला प्रदान करण्यात आला.
‘माझं वसमत, माझी जबाबदारी’
आमदार राजू भैया नवघरे यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आरळ येथील राखोंडे परिवाराचे नुकसान भरून निघणारे नाही, परंतु या संकटकाळात त्यांना आधार देणे आमचे कर्तव्य आहे. आज ही तातडीची मदत देण्यात आली असली, तरी भविष्यातही या कुटुंबाला जे जे शक्य असेल ते सहकार्य करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.”
परिसरातून कौतुक
केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे केल्याबद्दल आरळ ग्रामस्थांनी आणि वसमत मतदारसंघातील जनतेने आमदार नवघरे यांचे आभार मानले आहेत. ‘आपलं वसमत, आपला राजू’ या ब्रीदवाक्याला साजेसे काम त्यांच्या माध्यमातून होत असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!