आपला जिल्हाताज्या घडामोडी

वसमत जनगणना प्रशिक्षणास 15 जनांची दांडी

मुख्य संपादक रामु चव्हाण

 

वसमत / रामु चव्हाण

जनगणना 2027 या राष्ट्रीय कार्यासाठी जनगणना नियम 1990 नुसार कलम 4 च्या उपकलम 4 तरतुदी नुसार चार्ज अधिकारी म्हणून वसमत नगर परिषद मुख्याधिकारि सय्यद रफिक कंकर याना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन शहरातील जनगणना कार्यासाठी पर्यवेक्षक/प्रगणक म्हणुन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे..

आरटीई अधिनियम 2009 मधील कलम 27 अन्वये शिक्षकांना कायदेशीर रित्या जनगणना कार्यासाठी नियुक्त केले जाऊ शकते.

वसमत नगरपरिषद शहरी भागातील जनगणनेच्या कामासाठी दि.23/04/2026 ते 25/04/2026 याकालावधीत जनगणना विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. परंतु असे निर्दशनास आले आहे की, या कार्यालया कडुन प्रगणक / पर्यवेक्षक संदेश देऊनही सदर 40 पैकी 15 जण सदरील प्रशिक्षणास गैरहाजर राहिले आहे सदर प्रशिक्षण हे अत्यंत महत्वाचे व बंधनकारक असुन ही या प्रशिक्षणास गैरहजर राहिलात त्यामुळे जनगणना या राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण झाला आहे. तसेच जनगणना अधिनियम 1948 अन्वये जनगणना कार्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्रशिक्षणास उपस्थिती आवश्यक आहे.

त्यामुळे जनगणना अधिनियम 1948 मधील कलम 11 अन्वये जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यास कसुर करीत असल्याचे दिसुन येते म्हणुन सर्वानी नोटीस द्वारे सदर प्रशिक्षणस गैरहजर का राहिलयात याचे कारण लेखी स्वरुपात 3 दिवसाच्या आत या कार्यालयास समक्ष उपस्थित राहुन सादर करावे जर खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळून आल्यास आपणा विरुध्द पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची अशा प्रकारची नोटीस 15 शिक्षक व कालवा निरिक्षक याना देण्यात आलि आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!