वसमत शहरात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून, आज दिनांक ४ मे २०२६ रोजी कोठा रोड परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा एक हायवा पकडून जप्त करण्यात आला आहे.
नेमकी कारवाई काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कोठा रोडवरून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी श्री. विकास माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने सापळा रचला. यावेळी MH-26 CV-2521 क्रमांकाचा हायवा अवैध रेती वाहतूक करताना रंगेहाथ पकडण्यात आला.
या पथकाचा होता समावेश:
या धडक कारवाईत उपविभागीय अधिकारी श्री. विकास माने यांच्यासह मंडळ अधिकारी राजू क्षीरसागर, शिवानंद झोळगे, तसेच ग्राम महसूल अधिकारी राहुल कोल्हे, अमोल इंगळे, सुधीर इंगळे, धुमाळ आणि गायकवाड यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
पुढील कार्यवाही:
पकडण्यात आलेले वाहन (हायवा) पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध रेती उपसा करणाऱ्या आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नियमबाह्य कामांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट संकेत या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.