आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

भाजपाच्या विजयाचा वसमत येथे फटाक्याच्यी अतिषबाजी करत जल्लोष

मुख्य संपादक रामु चव्हाण

वसमतमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; फटाक्यांच्या आतिशबाजीत साजरा केला विजयोत्सव

वसमत: हरनामसिंग चव्हाण

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक विजयाचे पडसाद वसमत शहरातही उमटले असून, भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्थानिक झेंडा चौक येथे फटाक्यांची आतिशबाजी करत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.

विजयाचा आनंद आणि घोषणाबाजी

राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या यशाबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी झेंडा चौक परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांच्या मते, हा विजय विकासकामांची पावती असून यामुळे आगामी काळात पक्षाला अधिक बळ मिळणार आहे.

प्रमुख उपस्थिती

या विजयोत्सवाच्या प्रसंगी भाजपचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:

 शिवदास बोड्डेवार, उज्वलाताई तांबाळे, डॉ. मारोती क्यातमवार, शिवाजी अलडिंगे सुनील कार्ले, विष्णू बोचकरी,, संतोष हादवे,ज्ञानेश्वर मुंजाळ, आदित्य देशपांडे, विजय कडतन, मयूर नांवदर, गणेश कमळू, राजेश भालेराव, मारोती बूट्टे, संजय कळणे, अविनाश गायकवाड, गजानन पप्पलवाड, शिवाजी गोरे, हरी आलसटवार, गोविंद यजगे, माधुरी देशमुख,प्रवीण पोफाळकर, गंगाप्रसाद सातपुते, वैभव अण्वेकर, आकाश बोकन, सुनील आकाशे, प्रवीण पवार यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक या जल्लोषात सहभागी झाले होते.

“हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. या यशामुळे संपूर्ण देशात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे.”संतोष हादवे उपस्थित पदाधिकारी, भाजप वसमत

छायाचित्र: नागेश चव्हाण, वसमत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!