महाराष्ट्रराजकीयसामाजिक

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त डॉ. अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत शीख बांधवांसोबत विशेष बैठक!

20/6/2026

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त डॉ. अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत शीख बांधवांसोबत विशेष बैठक!

नांदेड:
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या ऐतिहासिक कामगिरीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात विशेष मेगा मोहीम (कॅम्पेन) राबवली जात आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे सर यांच्या ‘अंत्योदय’ कार्यालयात शीख बांधवांसोबत एका विशेष संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीत खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित सर्व सन्माननीय शीख बांधवांशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने नांदेड गुरुद्वाराच्या विकासासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय, विविध लोककल्याणकारी योजना आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी सविस्तरपणे मांडली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकाळात शीख समुदायाच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नांदेड गुरुद्वाराच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, ‘अंत्योदय’च्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

– डॉ. अजित गोपछडे (राज्यसभा खासदार)

या प्रसंगी शीख बांधवांनी केंद्र सरकारच्या धोरणांबद्दल आणि गुरुद्वारा विकासाच्या उपक्रमांबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. या बैठकीला शीख समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहिती सौजन्य:
गुरदीप सिंग संधू
मराठवाडा विभाग प्रमुख (शीख)
अल्पसंख्याक मोर्चा, भारतीय जनता पार्टी

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!