आपला जिल्हासामाजिक

सामूहिक विवाहातील ‘ओबीसी’, ‘व्हीजेएनटी’ दाम्पत्यांना मिळणार २५ हजारांचे अनुदान; प्रस्तावांचे आवाहन

संपादक हरनामसिंग चव्हाण

सामूहिक विवाहातील ‘ओबीसी’, ‘व्हीजेएनटी’ दाम्पत्यांना मिळणार २५ हजारांचे अनुदान; प्रस्तावांचे आवाहन

हिंगोली:
इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांसाठी शासनाच्या ‘कन्यादान योजने’अंतर्गत २५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यासाठी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.
योजनेच्या मुख्य अटी व पात्रता:
पात्रता: वधू-वर महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. वराचे वय किमान २१ वर्षे आणि वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
कागदपत्रे: सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आणि तहसीलदार/उपजिल्हाधिकारी स्तरावरील खातरजमा आवश्यक.
ही योजना विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठीही लागू आहे.
थेट लाभ: २५ हजार रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
संस्थांसाठीही अनुदान:
सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था किंवा शासकीय प्राधिकरणांनाही प्रति जोडपे ४ हजार रुपये शासकीय अनुदान दिले जाईल. यासाठी सोहळ्यात किमान १० जोडपी असणे आवश्यक आहे.
कुठे संपर्क साधाल? पात्र लाभार्थी आणि संस्थांनी आपले प्रस्ताव ‘सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली’ येथे सादर करावेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!