राजकीय

‘जनसामान्यांचा आधारवड’: अष्टपैलू विकासकामांच्या जोरावर राजूभय्यांची मंत्रिपदाकडे कूच!

संपादक: हरनामसिंग चव्हाण

‘जनसामान्यांचा आधारवड’: अष्टपैलू विकासकामांच्या जोरावर राजूभय्यांची मंत्रिपदाकडे कूच!

संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत
राज्याच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असताना वसमतचे आमदार राजूभय्या नवघरे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. केवळ राजकीय समीकरणेच नव्हे, तर त्यांनी गेल्या काही वर्षांत राबवलेले सामाजिक उपक्रम आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या मागणीला मोठी ताकद मिळत आहे.

प्रत्येकाला मान, सामान्यांचा सन्मान
“प्रत्येकाला मान समान” हे ब्रीदवाक्य जपत आमदार नवघरे यांनी राजकारणात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, सर्वसामान्य माणसाच्या हाकेला धावून जाण्यात ते नेहमीच तत्पर असतात. मग तो प्रशासकीय कामातील अडथळा असो किंवा वैयक्तिक अडचण, ‘राजूभय्या’ हे नाव आज विश्वासाचे प्रतीक बनले आहे.

महिलांना देवदर्शन आणि सामाजिक बांधीलकी
महिलांच्या सक्षमीकरणासोबतच त्यांच्या श्रद्धेचा मान राखत आमदार नवघरे यांनी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात ‘महिला देवदर्शन’ सहलींचे आयोजन केले. तसेच, आर्थिक अडचणींमुळे लग्नाचे स्वप्न पूर्ण करू न शकणाऱ्या कुटुंबांसाठी त्यांनी ‘सामूहिक विवाह सोहळे’ आयोजित करून शेकडो संसार उभे केले आहेत. या उपक्रमांमुळे घरोघरी त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.
शेतकरी, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्राला बळ
शेतकरी नैसर्गिक संकट असो वा पिकांच्या भावाचा प्रश्न, शेतकऱ्यांना तत्पर मदत देण्यात त्यांचा हातखंडा आहे.
व्यापारी वर्गातही त्यांची मोठी पकड असून, स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात.
शिक्षण क्षेत्रात गरीब विद्यार्थ्यांना फीसाठी मदत असो किंवा शाळांच्या पायाभूत सुविधा, तिथेही नवघरे यांनी मोलाचे कार्य केले आहे.

दादांचा शब्द अन् जनतेची अपेक्षा
“राजूचे काम बोलतंय” असे म्हणत अजितदादांनी जो शब्द दिला होता, तो आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. मतदारसंघात घुमणारे हे शब्द आणि प्रत्यक्ष जमिनीवर झालेले काम पाहता, राजूभय्या नवघरे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन दादांचे स्वप्न पूर्ण होणार का? ‘दादांचा वादा, ताई पाळणार का?’ याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
विकासाचा हा झंझावात पाहता, वसमतला यावेळी मंत्रिपद मिळून ‘लाल दिवा’ येणारच, असा विश्वास जनतेमधून व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!