आपला जिल्हा

वसमतमध्ये वीरशैव लिंगायत गवळी समाजाचा ७ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न होणार

संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये वीरशैव लिंगायत गवळी समाजाचा ७ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न होणार

संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत
येथील वीरशैव लिंगायत गवळी समाज व नवयुवक संघटना, वसमतनगर यांच्या वतीने ७ व्या भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, १० मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर ‘प्रसाद गार्डन मंगल कार्यालय’, परभणी रोड, वसमत येथे पार पडणार आहे.
विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम
या विवाह सोहळ्यानिमित्त शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी देवकार्याचे आयोजन करण्यात आले असून, १० मे रोजी सकाळी ९:०० वाजता वीरशैव लिंगायत गवळी मारोती मंदिर, वसमत येथून वाजत-गाजत ‘शेवंती’ निघणार आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार मिळावा आणि विवाहावरील अनावश्यक खर्च टाळला जावा, या उदात्त हेतूने गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.
६ जोडपे अडकणार विवाहबंधनात
यावर्षीच्या सोहळ्यात एकूण ६ वधू-वर जोडप्यांचा विवाह लावला जाणार आहे. यामध्ये:
१. चि.सौ.कां. आकांक्षा (रा. वसमत) आणि चि. प्रतीक (रा. नांदेड)
२. चि.सौ.कां. पुनम (रा. वसमत) आणि चि. राहुल (रा. मुदखेड)
३. चि.सौ.कां. अवंतिका (रा. नांदेड) आणि चि. पवन (रा. दिग्रस)
४. चि.सौ.कां. साक्षी (रा. वसमत) आणि चि. लखन (रा. नांदेड)
५. चि.सौ.कां. श्रृती (रा. वसमत) आणि चि. कृष्णा (रा. जालना)
६. चि.सौ.कां. दुर्गा (रा. हिंगोली) आणि चि. पवन (रा. पेठू)
अशा जोडप्यांचा समावेश आहे.
समितीचे परिश्रम
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष माधव प्रकाशअप्पा पटाईत, उपाध्यक्ष त्र्यंबक गिरजाप्पा सैदाने, सचिव नारायण बाबूरावजी आल्लमखाने, तसेच अ‍ॅड. दिपक कडेकर, रमाकांत बल्लमखाने, ऋषीकेश कानबाले, सौ. सुनिता बल्लमखाने आणि सौ. वनमाला सैदाने यांसह समस्त वीरशैव लिंगायत गवळी समाज बांधव व नवयुवक संघटना परिश्रम घेत आहेत.
या सोहळ्याचे आयोजक म्हणून स्व. मुरलीधर गंगारामजी भुसारे यांच्या स्मरणार्थ श्री. शंकर मुरलीधर भुसारे आणि श्री. दिपक मुरलीधर भुसारे व समस्त भुसारे परिवार जबाबदारी पार पाडत आहेत.
या मंगल प्रसंगी सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून वधू-वरांना शुभ आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्वाची टीप: विवाह स्थळी धुम्रपान व मद्यपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!