आपला जिल्हा

वसमतचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांचे बंधू व मातोश्री हज यात्रेसाठी रवाना; आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या हस्ते सत्कार

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांचे बंधू व मातोश्री हज यात्रेसाठी रवाना; आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या हस्ते सत्कार

संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत
पवित्र हज यात्रेसाठी रवाना होणाऱ्या भाविकांचा निरोप समारंभ आज वसमत शहरात उत्साहात पार पडला. शहराचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांच्या मातोश्री आणि त्यांचे मोठे बंधू सय्यद अफरोज सय्यद नासेर अली हे आज सौदी अरेबियातील मक्का-मदीना येथे हज यात्रेसाठी रवाना झाले.
या प्रसंगी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांनी सय्यद इम्रान अली यांच्या निवासस्थानी भेट देऊन दोन्ही हज यात्रेकरूंचा सन्मानपूर्वक सत्कार केला व त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
आमदारांचाही झाला सत्कार
यावेळी उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांच्या वतीने आमदार राजू भैया नवघरे यांचाही शाल व पुष्पहार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या स्नेहपूर्ण भेटीमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने वातावरण भारावून गेले होते.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष कन्हैया बाहेती, सचिन दगडू सर्व सन्माननीय नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी दोन्ही यात्रेकरूंना पुष्पहार अर्पण करून निरोप दिला.
छाया: नागेश चव्हाण, वसमत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!