आपला जिल्हाक्राईम स्टोरी

वसमतमध्ये हळद व्यापाऱ्याच्या दुकानचे शट्टर तोडून, पावणे दोन लाखांची हळद लंपास

मुख्य संपादक रामु चव्हाण

(मुख्य संपादक )रामू चव्हाण

वसमत येथील साई नगर भागात असलेल्या एका हळद प्रक्रिया उद्योगाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७५ हजार रुपये किमतीची २५ कट्टे हळद चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वसमत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील माधवराव कुबडे (वय ३६, रा. चौधरी नगर, वसमत) यांचे साई नगर भागात ‘आर्यन ट्रेडिंग कंपनी’ नावाचे हळदीचे दुकान व प्रक्रिया केंद्र आहे. ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांनी दुकान नेहमीप्रमाणे बंद केले होते. १० मे रोजी त्यांच्या भावाचे लग्न असल्याने दिवसभर दुकान बंद होते.
अशी झाली चोरी
११ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजारील व्यापारी सचिन कापूसकरी यांनी कुबडे यांना फोन करून त्यांच्या दुकानाचे शटर उचकटलेले असल्याचे सांगितले. सुनील कुबडे यांनी तातडीने दुकानावर जाऊन पाहणी केली असता, दुकानातील एकूण १५० कट्ट्यांपैकी २५ कट्टे हळद गायब असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला आणि अंदाजे १२ क्विंटल ५० किलो वजनाची हळद चोरून नेली.
नुकसानीचा तपशील
चोरीला गेलेल्या हळदीची बाजारभावाप्रमाणे किंमत प्रति क्विंटल १४,००० रुपये असून, एकूण १,७५,००० रुपयांचा माल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी इतर सामानाला हात न लावता केवळ हळदीचे कट्टेच टार्गेट केले.
या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

चोरीत वापरले व्याप-याचे टाटा पिकप ?

वसमत मोंढा भागातील एका व्याप-याची पिकप अज्ञात चोरट्याने दि.10 मे ला रात्री पळवले व आज दि.11 मे ला घरासमोर आनुन उभे केले ..यातच चोरीचा माल पळविल्याच संशय आहे .
याच पिकप मध्ये हळदीचा चोरटी वाहतूक झाली का,याचा शोध स्थानिक गुन्हे शाखा व वसमत शहर पोलीस घेत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!