वसमत तालुक्यातील बाभूळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न
संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत तालुक्यातील बाभूळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न


प्रशासकीय सेवा आता थेट जनतेच्या दारी; शेकडो नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ
संपादक हरनामसिंग चव्हाण
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जनकलल्याणाकारी उपक्रमांतर्गत, वसमत तालुक्यातील मौजे बाभूळगाव येथे आज दिनांक १२ मे २०२६ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल आणि इतर शासकीय विभागांच्या सेवा थेट ग्रामस्थांच्या उंबरठ्यावर पोहोचवण्यात आल्या.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
हे शिबिर वसमतचे उपविभागीय अधिकारी (SDO) श्री. विकास माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी तहसीलदार श्री. विनोद डोणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजनांची सविस्तर माहिती देऊन, या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
लोकहितार्थ कामांचा निपटारा
बाभूळगाव मंडळातील नागरिकांसाठी आयोजित या शिबिरात विविध विभागांनी आपले स्टॉल्स लावून प्रत्यक्ष कामांचा निपटारा केला. यामध्ये प्रामुख्याने:
प्रमाणपत्र वितरण उत्पन्न, जातीचे आणि ई-प्रमाणपत्रांचे जागेवरच वाटप करण्यात आले.
पुरवठा विभाग नवीन शिधापत्रिका (Ration Card) वाटप आणि दुरुस्तीबाबत कार्यवाही करण्यात आली.
सामाजिक न्याय संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
आरोग्य तपासणी तसेच शेतीविषयक शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री. हांडे साहेब, श्री. अनिल पाटील साहेब, मंडळ अधिकारी श्रीमती सुप्रिया जिंतूरकर मॅडम, ग्राम महसूल अधिकारी श्री. गुड्डलवर, श्री. पांडे, श्री. पाईकराव, श्री. सुधीर इंगळे, श्रीमती पडोले मॅडम, श्री. सर्कलवाड, श्री. राठोड तसेच सर्व कोतवाल, पोलीस पाटील आणि गावचे सरपंच उपस्थित होते.
या शिबिरामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला असून, प्रशासकीय यंत्रणा प्रत्यक्ष गावात आल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रमाला बाभूळगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छाया नागेश चव्हाण, वसमत.



