राजकीय

PMAY-CLTC कर्मचाऱ्यांचे म्हाडा व नगरविकास विभागात कायमस्वरूपी समावेशन करा आ. हेमंत पाटील यांना साकडे

संपादक हरनामसिंग चव्हाण

 

PMAY-CLTC कर्मचाऱ्यांचे म्हाडा व नगरविकास विभागात कायमस्वरूपी समावेशन करा आ. हेमंत पाटील यांना साकडे

वसमत CT NEWS संपादक हरनामसिंग चव्हाण

नांदेड/हिंगोली:
प्रधानमंत्री आवास योजना (शहर) अंतर्गत कार्यरत असलेल्या शहर स्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC) कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटील यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले. म्हाडा आणि नगरविकास विभागात नवीन तांत्रिक संवर्ग निर्माण करून या कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समावेशन करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
नेमकी मागणी काय?
गेल्या अनेक वर्षांपासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तांत्रिक तज्ञ म्हणून हे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या सेवेबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
म्हाडा (MHADA) आणि DMA नगरविकास विभागात नवीन पदे निर्माण करावीत.
PMAY-CLTC कर्मचाऱ्यांना या पदांवर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे.
आमदारांचे आश्वासन
शिष्टमंडळाच्या मागण्या अत्यंत सकारात्मकतेने ऐकून घेतल्यानंतर आमदार हेमंत पाटील यांनी या विषयाचे गांभीर्य मान्य केले. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून, या विषयाच्या अनुषंगाने तातडीने बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
“तुमच्या न्याय्य हक्कांसाठी मी सरकारकडे पाठपुरावा करेन आणि मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. —आमदार हेमंत पाटील

यांची होती उपस्थिती
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अहसान, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह मोहम्मद जुबेद, गजानन गादणे, समीर कुरेशी, माधव क्षीरसागर, सय्यद शारेख, राहुल पाटील, प्रसाद कदम, राहुल सातूरवार, विशाल ढोरे, सोमेश देसाई आणि संतोष पवार आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!