आमदार राजूभैया नवघरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची भेट
संपादक हरनामसिंग चव्हाण

आमदार राजूभैया नवघरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची भेट
वसमतच्या विकासकामांवर झाली सविस्तर चर्चा
संपादक हरनामसिंग चव्हाण
मुंबई (प्रतिनिधी)
वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैया नवघरे यांनी आज मुंबई येथील ‘देवगिरी’ निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी वसमत मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि आगामी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.
कृषिभवन इमारतीसाठी निधीची मागणी केली
या चर्चेमध्ये आमदार नवघरे यांनी वसमत येथील ‘कृषिभवन’ इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न प्रामुख्याने मांडला. या इमारतीच्या बांधकामासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे भवन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना आमदार नवघरे म्हणाले की, “स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीप्रमाणेच सुनेत्रावहिनी देखील प्रत्येकाच्या समस्या शांतपणे समजून घेतात. विशेष म्हणजे, जे काम होण्यासारखे आहे त्यावर त्या तात्काळ तोडगा काढण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि निर्णयक्षम नेतृत्व राज्याच्या विकासाला निश्चितच नवी दिशा देणारे आहे.”
वसमत विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा निर्धार आमदार राजूभैया नवघरे यांनी यावेळी व्यक्त केला. या भेटीमुळे वसमतमधील अनेक विकासकामांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.


