आपला जिल्हा

वसमतच्या शिरपेचात मानाचा तुरा: ‘लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड’ला पुण्यात बहुमानाचा ‘प्लॅटिनम अवॉर्ड’! केवळ दुसऱ्याच वर्षी मिळवला मल्टिपल स्तरावरील सर्वोच्च बहुमान; विविध सामाजिक उपक्रमांची घेतली दखल.

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या शिरपेचात मानाचा तुरा: ‘लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड’ला पुण्यात बहुमानाचा ‘प्लॅटिनम अवॉर्ड’!
केवळ दुसऱ्याच वर्षी मिळवला मल्टिपल स्तरावरील सर्वोच्च बहुमान; विविध सामाजिक उपक्रमांची घेतली दखल.

वसमत CT NEWS

जागतिक पातळीवर सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेल्या ‘लायन्स इंटरनॅशनल’ अंतर्गत, ‘लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड’ या संस्थेने आपल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा ठसा उमटवत थेट मल्टिपल स्तरावरील ‘प्लॅटिनम अवॉर्ड’ (Platinum Award) पटकावला आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या बहुप्रांतीय डिस्ट्रिक्ट ३२ ३४ च्या ‘विजयोत्सव’ अधिवेशनात वसमतच्या या शिलेदारांना ‘व्हिजन’ प्रोजेक्ट अंतर्गत या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्लबचे हे केवळ दुसरेच वर्ष असून, इतक्या कमी कालावधीत मिळालेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुण्यातील ‘विजयोत्सव’ अधिवेशनात गौरव
पुणे येथे १६ आणि १७ मे रोजी भव्य ‘विजयोत्सव’ अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, धुळे, गोंदिया अशा विविध भागांतील एकूण ४०४ क्लब आणि त्यांचे १६ हजार ६४ सदस्य कार्यरत आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ६०० हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. या संपूर्ण प्रांतातून वसमत प्राईडने आपल्या ‘व्हिजन’ प्रकल्पांतर्गत केलेल्या नेत्रदीपक कार्यामुळे बाजी मारत ‘प्लॅटिनम अवॉर्ड’वर आपले नाव कोरले.
दिग्गजांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान
हा सोहळा मल्टिपल चेअरपर्सन विजय सारडा यांच्या अध्यक्षतेखाली आणि पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर प्रवीण छाजेड यांच्या हस्ते उद्घाटीत झाला. मंचावर सीआयडी नरेंद्र भंडारी, डिस्ट्रिक्ट ३२ ३४ बी-२ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रीना छाजेड, इंटरनॅशनल डायरेक्टर राजेंद्र मूछल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अश्विन कुमार बजोरिया, आणि मल्टिपल सेक्रेटरी गिरीश भाई सिसोदिया या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राहुल औसेकर, पीडीजी योगेश जयस्वाल, सुप्रियाताई कोतवाल, अरुण चतुर्वेदी, निशिकांत प्रताप, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रदीप गर्गे आणि ट्रेझरर डॉ. कैलास मुरारका यांनीही वसमत क्लबच्या कार्याचे कौतुक केले.
वसमतमध्ये सामाजिक कार्याचा नवा पायंडा!
लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईडने गेल्या दोन वर्षांत शहरात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. क्लबतर्फे राबवण्यात आलेले काही प्रमुख उपक्रम खालीलप्रमाणे
आरोग्य सेवा भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, तसेच भव्य मधुमेह तपासणी शिबिरांचे आयोजन.
गरीब व अनाथ कल्याण गरजूंना पांघरूण वाटप, तर दिवाळीनिमित्त अनाथ आश्रमातील मुलांना फराळ वाटप.
पर्यावरण व शिक्षण भव्य वृक्षलागवड मोहीम, शिक्षक दिनी गुरुजनांचा गौरव आणि आश्रमशाळेतील दिव्यांग (अपंग) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
कला व क्रीडा प्रोत्साहन नरहर कुरुंदकर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ नाट्य प्रयोग व संगीत मैफिलीचे आयोजन, सायकल पटूंचा सत्कार आणि भव्य रांगोळी स्पर्धा.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
वसमत प्राईडला मिळालेल्या या यशामुळे क्लबचे अध्यक्ष राजू सिद्दिकी, उपाध्यक्ष अॅड. अरुण आंबेकर**, **कल्याण कुरुंदकर, सचिव बाळासाहेब बेले कोषाध्यक्ष संजीवकुमार बेंडके यांच्य सह कार्यकारिणीचे सदस्य सर्वश्री गौस भाई बागवान, सीए एकनाथ जगताप, राजाराम जगताप, आलोक जाधव, समीर कुरेशी, संदीप चव्हाण सर, प्रा. विक्रम कुंटूरवार, डॉ. वैभव पडोळे, डॉ. सागर सातपुते, प्रसन्ना देशपांडे, सचिन दगडू, सुहास काकडे, संदीप टाक, माजी अध्यक्ष योगेश चेपूरवार, एड. प्रदीप देशमुख, वैजनाथ कदम आदींचे सर्वच स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
या अधिवेशनाला प्रामुख्याने खामगावचे लायन्स नरेश भाई चोपडा, तेजस झांबड, जालनाचे विजय दाढ, नांदेडचे गंगाभीषणजी कांकर, मोदीजी, रवी कडगे, डॉ. मोहन देशमुख, डॉ. गर्गे साहेब, अकोल्याचे सुभाषजी चांडक, संभाजीनगरचे संजय गुप्ता आणि लातूरचे श्री. पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
“केवळ दोन वर्षांच्या प्रवासात मिळालेला हा प्लॅटिनम पुरस्कार आमच्या संपूर्ण टीमच्या सांघिक कष्टाचे आणि वसमतकरांच्या विश्वासाचे फलित आहे. भविष्यातही आमचा क्लब अधिक जोमाने सामाजिक कार्यात अग्रसेर राहील.”
लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड टीम

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!