आपला जिल्हा

आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या प्रयत्नांना यश; वसमत मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांसाठी मिळणार निधी!

संपादक हरनामसिंग चव्हाण

आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या प्रयत्नांना यश; वसमत मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांसाठी मिळणार निधी!

वसमत CT NEWS

आज मुंबई येथे वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. राजूभैय्या नवघरे यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रराजे भोसले साहेब यांची भेट घेतली.
या भेटीत वसमत मतदारसंघातील हायब्रीड ॲन्युटी योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा व विनंती करण्यात आली.
यावर माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, नवीन रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
“मतदारसंघातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि सुकर प्रवास सुविधा मिळावी, तसेच ग्रामीण भागाचा विकास अधिक गतिमान व्हावा यासाठी माझा पाठपुरावा आणि प्रयत्न अविरत सुरूच राहतील!”
— आमदार राजूभैय्या नवघरे

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!