महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी इंजी. अमितकुमार काबरा यांची बिनविरोध निवड
वसमत / रामु चव्हाण
महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशन (सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना) यांच्या हिंगोली जिल्हाध्यक्ष पदासाठी आज झालेल्या बैठकीत इंजी. अमितकुमार बाळकृष्णजी काबरा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंते व कंत्राटदारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवड प्रक्रियेवेळी संघटनेचे राज्याध्यक्ष इंजी. प्रदीपभाऊ पडोळे, राज्य महासचिव इंजी. एम. ए. हकीम, निवडणूक निर्णय अधिकारी इंजी. प्रकाश गुट्टे, नांदेड जिल्हाध्यक्ष इंजी. दिलीप बाळसकर, माजी जिल्हाध्यक्ष इंजी. गुलाम कुरेशी, माजी जिल्हाध्यक्ष इंजी. विठ्ठल शिंदे, तसेच इंजी. एम. के. कोटकर, इंजी. भूषण जयस्वाल, इंजी. दिनेश जाधव यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार अभियंते व कंत्राटदार उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष इंजी. अमितकुमार काबरा यांचे अभिनंदन करून संघटनेच्या माध्यमातून अभियंत्यांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. संघटनेच्या बळकटीसाठी आणि बेरोजगार अभियंत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Back to top button
Don`t copy text!